|| देणगी ||
संस्थेचा आजपर्यंतचा सर्व खर्च हा लोकाश्रयावरच होतो.संस्थेला कोणताही उत्पन्नाचा स्त्रोत नाही. वेदकार्य लोकाश्रयावर चालावे, जेणेकरून
सामाजिक सहभाग या माध्यमातून “माधुकरी” पद्धतीने “ओम् भवति भिक्षां देहि” असं उच्चारून
भिक्षान्न पवित्रान्न सेवन, रविवार पासून शनिवार पर्यंत एखाद्या वारी अन्नदान ही भावना
ठेवून गृहस्थ मातांनी या विद्यादानाच्या कार्यात आपली भूमिका बजावली. पुढील अन्नदान
व्यवस्था संस्थेतच व्हावी ही सदिच्छा ठेवून सन २००० साली २१०० रुपयात संस्थेने हे कार्य
हाती घेतले. अन्नपूर्णा मातेच्या कृपाशीर्वादाने थोडी थोडी दृढता व सुदृढ अशी व्यवस्था
लोकांनी केलेल्या दानावर उभी राहिली आहे. अनेक वेदप्रेमींच्या ब्राम्हणभोजनाचा संकल्प
यामुळे पूर्ण होतो.यामध्ये आजपर्यंत अनेक पदाधिकार्यांच्या योगदानाने छात्रांना वेळच्यावेळी
उत्कृष्ट व सकस असे अन्न मिळुन जे अन्न वेदाभ्यासाने जिरते त्यातून दात्याचे अक्षय्य
कल्याण साधते.संस्थेची जीर्ण वास्तू पाडून नवीन बांधण्यासाठी अनेक प्रतिबंध होते.वेदप्रेमींच्या
पवित्रदानाने-लोकाश्रयानेच दिव्य अशी नूतन वास्तू साकार झाली. अन्नदान, गोपरिचर्या,
इमारतनिधी या तीन प्रकारात संस्थेकडून दान स्विकारले जाते.संस्थेस 80 जी अंतर्गत सवलत
उपलब्ध आहे. वेदपुरूषाच्या आशिर्वादाने तसेच वेदप्रेमींच्या सहकार्याने वेदाध्यापनाचे
कार्य भविष्यातही चालू राहील. आर्थिक तसेच इतर सहाय्य रोख अथवा चेकचे स्वरूपात संस्थेच्या
कार्यालयात स्वीकारले जाते. चेक अथवा डिमांड ड्राफ्ट
‘पुणेवेदपाठशाळा’ या नावाने काढण्यात यावा.
पुणे वेदपाठशाळेचे बँक ऑफ महाराष्ट्र, शनिवार पेठ मध्ये खाते आहे, तरी आपण कोर बँकिंगद्वारेही देणगी देऊ शकता.
Account Name
|
Pune VedpathShala
|
Account Number
|
60152740444
|
IFSC Code
|
MAHB0000675
|
इमारत निधीसाठी कृपया खालील बँक खात्या मध्ये देणगी जमा करावी
Account Name
|
Pune VedpathShala
|
Account Number
|
20136939650
|
IFSC Code
|
MAHB0000675
|