|| शिक्षण||


उपनयनाचा प्रमुखकाळ म्हणजेच ८ ते १६. पाठशाळेत ८ ते १२ या वयोगटातील मुलांनाच प्रवेश दिला जातो जेणेकरून १० ते १२ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून छात्र त्याच्या कुवती प्रमाणे जास्तीतजास्त वेदाभ्यास व यज्ञकार्य करुन चांगला पुरोहित बनेल आणि समाजाला त्याचे मार्गदर्शन लाभेल. ऋग्वेदसंहिता, ब्राह्मणग्रंथ, आरण्यक, शिक्षा, ज्योतिष, निघंटु, छंद, निरूक्त, अष्टाध्यायी, श्रौतसूत्र व गृह्यसूत्र हे दशग्रंथ त्यापुढे पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ व घनपाठ तसेच षोडशसंस्कार, श्राद्धप्रक्रिया, शांति, मूर्तीप्राणप्रतिष्ठा, और्ध्वदेहिकविधि, नित्यकर्मासहित सर्व विषयांचे ज्ञान देण्याची व्यवस्था शाळेकडून केली जाते.

दैनंदिन अध्ययनाची रूपरेषा


सत्र १ पहाटे ४:३० ते ६:०० आवृत्ती
६:०० ते ७:०० स्नानसंध्या, नित्यकर्म
७:०० ते ८:३० संथा म्हणणे
८:३० ते ९:०० उपहार

सत्र २ ९:०० ते १२:०० संथा + शालेय शिक्षण
१२:०० ते २:३० भोजन, स्वच्छता इत्यादी

सत्र ३ २:३० ते ५:३० संथा म्हणणे
५:३० ते ६:०० खेळ
६:०० ते ७:०० संगणक वर्ग
७:०० ते ८:०० संध्या, अध्ययन, उपासना
८:०० ते ९:०० रात्रीचे भोजन
९:०० ते १०:०० वाचन

Shikshan
Shikshan

Shikshan
Shikshan
80G