|| संस्था स्थापनेचा उद्देश ||
१३४ वर्षांहून अधिक दीर्ध परंपरा असलेल्या संस्थेचे वेदाध्यापनाचे कार्य अव्याहतपणे आजही चालू आहे. वेदपाठशाळेमध्ये प्रामुख्याने
गुरुकुल पद्धतीने ऋग्वेद शाकल शाखा, कृष्णयजुर्वेद तैत्तिरीय शाखा यांचे अध्यापन केले जाते. त्याच बरोबर कर्मानुष्ठानासाठी अत्यावश्यक अशा 'याज्ञिक'
विषयाचे शिक्षण दिले जाते.
संस्थेचे वेदाध्यापनाबरोबरच पाठशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीचे दृष्टीने योगासन वर्ग, संस्कृत वर्ग, संगणक वर्ग,
ठराविक मर्यादेपर्यंत शालेय शिक्षणाचे क्रमिक वर्ग सुरु केले आहेत. संस्थेतील
सर्व विद्यार्थ्यांसाठी वरील शिक्षण, निवास व भोजन इत्यादी व्यवस्था विनामूल्य केली जाते.
सध्या संस्थेत एकूण चाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अध्यापनाचे दृष्टीने घनपाठी व इतर वैदिकांची अध्यापक म्हणून नियुक्ती केलेली
आहे. सध्या ऋग्वेद, कृष्ण यजुर्वेद व याज्ञिक इत्यादीसाठी पाच अध्यापकांची नियुक्ती
केलेली आहे.
संस्थेची स्वत:च्या मालकीची नूतन वास्तू वेदप्रेमींनी दिलेल्या आर्थिक योगदानाने पूर्ण झालेली आहे. यामध्ये यज्ञशाळा, गोशाळा, सभागृह, अध्ययनवर्ग, भोजनगृह, विद्यार्थ्यांसाठी निवासखोल्या,
कार्यालय, ग्रंथालय तसेच अभ्यागतांसाठी जागा इत्यादींची व्यवस्था करण्यात
आली आहे. बुद्धी व शक्तीचे प्रतिक असलेल्या श्रीहनूमंताचे मंदिर वास्तूत आहे.
प्राचीन संस्थांपैकी पुणे वेदपाठशाळा ही एक आहे आणि प्रतिकूल परिस्थितीतही तिने आपले कार्य निष्ठेने आणि धैयार्ने चालविले आहे.